
पावसाळा आलाय ! सांध्यांना सूज येतीय, सांधे दुखतायत? हे उपाय नक्की करून बघा !!
July 27, 2025अभ्यंग
‘अभि’ म्हणजे दिशेने किंवा वर, तर ‘अंजना’ म्हणजे अभिषेक करणे किंवा मालिश करणे, यावरून अभ्यंग म्हणजे डोक्यासह संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करणे.आयुर्वेदानुसार, शरीरातील दोष (ऊर्जा) संतुलित करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी शरीरास बाहेरून तेल मालिश हा एक नैसर्गिक उपाय आहे.
अभ्यंगाचे फायदे:
दोष परिणाम: दोषांनुसार तेल वापरून अभ्यंग केल्याने वात-पित्त-कफ दोष कमी येतात.
रक्तसंचार सुधारतो: अभ्यंगामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे पेशींना ऑक्सिजन मिळतो आणि स्नायू रिलॅक्स होतात.
तणाव कमी होतो: तेल मालिशमुळे शरीरातील ताण कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.
शरीर डिटॉक्स होते: हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते.
त्वचेसाठी फायदेशीर: शास्त्रोक्तरीत्या तयार केलेले तेल त्वचेत शोषले जाते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. त्वचा कोमल आणि नितळ होते. त्वचेचा वर्ण उजळतो आणि ती उजळ दिसते. कोरड्या त्वचेची समस्या कमी होते. त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात.
शरीरासाठी फायदेशीर: शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. शरीराचा जडपणा कमी होतो आणि उत्साह वाढतो. स्नायू बलवान आणि पुष्ट होतात. शरीरातील अनावश्यक मेद (चरबी) कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीराचे तापमान नियंत्रित राहते. शरीरातील वेदना आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.
मनासाठी फायदेशीर: मन शांत आणि प्रसन्न राहते. थकवा कमी होतो. चिंता आणि अस्वस्थता कमी होते. चांगली झोप येते.
वेदना कमी होतात:
अभ्यंग कधी करावे?
आयुर्वेदानुसार, अभ्यंग केवळ दिवाळीसाठी नसून वर्षभर रोज करावे. विशेषतः हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, तेव्हा अभ्यंग करणे फायदेशीर ठरते. अभ्यंग रोज करावे.
अभ्यंग कसे करावे?
शरीराला मालिश करण्यापूर्वी कोमट तेल गरम करा.
टाळूपासून पायाच्या तळव्यापर्यंत संपूर्ण शरीरावर तेल लावा. रक्तप्रवाहाच्या दिशेने (हृदयाकडे) मालिश करा.
अभ्यंग किती वेळ करावे?
अभ्यंग हे तीस ते साठ मिनिटे करावे. प्रकृतीनुसार अभ्यंगाचा काळ ठरवावा.
अभ्यंग केव्हा करू नये?
ताप असताना, खूप सर्दी आणि अंगदुखी असताना, जेवण झाल्यावर लगेच, मासिक पाळीच्या काळात.
स्वतःसाठी योग्य तेल निवडा : तेल अभ्यंग आणि दोष
चंदनादी तेल – पित्तशमन
तीळ तेल – वातशमन
मोहरी तेल – कफशमन



