
जुनी सांधेदुखी: आयुर्वेदिक उपाय, पंचकर्म आणि आहाराचे महत्त्व
January 21, 2025पावसाळ्यात शरीरातील वात दोष वाढल्यामुळे सांधेदुखी किंव्हा सांध्यांना सूज येणे असे त्रास उद्भवतात. खास करून वयोवृद्ध लोकांना याचा त्रास जास्त जाणवतो.
पावसाळ्यात सांधेदुखी कमी करण्याचे उपाय:
संतुलित आहार:
किमान १ चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. (त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं आवश्यक आहे.) ओल्या नारळाचा वापर, सुक्या खोबऱ्याचा वापर, अंजीर, खजुर, मोसंबी, आंबा, संत्री, पपया, चेरी सर्व प्रकारच्या बेरी, अक्रोड ही फळं अत्यंत लाभदायी ठरतात. तिळाचा, खुरासणीचा आहारात आवर्जून वापर करावा, शतावरी (भाजीची), गाजर, मेथीदाणा, गाजर, मटार, मोहरी, ओक्रा, ऑलिव्ह भिजवलेला कांदा, तूपात तळलेला लसुण भोपळा, बदाम, आमचूर, तुळस, केळफूल, दगडफूल, लवंग, दालचिनी, कोथिंबीर, आलं, पिंपनी, चिंच, हळद, वेनित्रा, संत्रासाल, पेपरमिंट, पुदिना, काळेतील यांचा वापर आवडीप्रमाणे करावा. तसेच ऋतूनुसार येणाऱ्या हिरव्या भाज्या, फळ, फळभाज्या या वातनाशक आहारामुळे शरीरातील सूज कमी होते आणि वेदना कमी होतात.
नियमित व्यायाम:
घरामध्ये खुर्चीत बसून स्ट्रेचिंग पोझेस, साधे चालणे, ध्यान आणि योगा यांसारखे व्यायाम नियमितपणे करा. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि सांध्यांची लवचिकता वाढते, ज्यामुळे वेदना कमी होतात. ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
गरम शेक:
2 वाट्या मोहरीचं तेल + 1 स्पून ओवा + 1 स्पून लवंग + 2 स्पून मेथ्या + 8-9 लसूण घालून दहा ते पंधरा मिनिटे चांगले उकळावे थंड झाल्यावर गाळून बरणीत भरून ठेवावे या तेलाचा सांध्यांना मसाज करून तव्यावर फडके गरम करून त्याचा शेक द्यावा. किंवा गरम पाण्याने शेकल्याने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने सांध्यांवर शेकल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात.
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवा:
पावसाळ्यात शरीराचे तापमान कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे सांधेदुखी वाढू शकते. त्यामुळे गरम कपडे घाला आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवा.
पुरेशे पाणी प्या:
कोमट लिंबू पाणी, हळदसिद्ध पाणी, सुंठसिद्ध पाणी आणि ऋतूनुसार भाज्यांचे गरम सूप पिल्यामुळे सांध्याची सूज आणि वेदना कमी होतात. दररोज गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील वात कमी येतो. पुरेसे पाणी प्यायल्याने सांध्यांची लवचिकता टिकून राहते आणि वेदना कमी होतात.
वजन नियंत्रणात ठेवा:
तेलकट, मसालेदार, तळलेले, परिसर्वेटिव्ह, फास्ट फूड, साखर अजिबात खाऊ नये. मिठाचे प्रमाण कमी करावे. जास्त वजनामुळे सांध्यांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे वेदना वाढू शकतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
आरामदायी शूज:
आरामदायक आणि चांगले कुशनिंग असलेले शूज वापरा, ज्यामुळे सांध्यांवर कमी ताण येईल.
पुरेशी विश्रांती:
शरीराला आराम देणे देखील महत्त्वाचे आहे, त्यामुळे जास्त शारीरिक कष्ट टाळा.
नियमित पंचकर्म:
नियमित पंचकर्म थेरपी करावे. जानुबस्ती, बस्ती, जानुपिचू यांसारख्या बऱ्याच पंचकर्म थेरपींमुळे शरीरातील संचार करणारा वात दोष शिवाय स्थानिक सांध्यांमध्ये असलेला वात दोष पूर्ण पणे नियंत्रणात येऊन सांधेदुखी कमी येते.
डॉक्टरांचा सल्ला:
जर वेदना जास्त असतील किंवा घरगुती उपायांमुळे आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉ. शर्वरी यांचे योगदान
डॉ. शर्वरी गेल्या १५ वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विविध ठिकाणी मोफत शिबिरे घेऊन आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच, आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्माच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना संधिगत वाताच्या त्रासातून मुक्त केले आहे.
पुस्तके आणि मार्गदर्शन
डॉ. शर्वरी यांनी आयुर्वेदिक आहाराविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक ‘रसभ्रमंती (आयुर्वेदिक पथ्यकर पाककृती)’ प्रकाशित केले आहे, जे क्लिनिकमध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
तसेच, त्यांची पुढील ई-पुस्तके अमेझॉन किंडलवर उपलब्ध आहेत:
आयुर्वेदिक फेशिअल विथ नॅचरल रेमेडिस (इंग्रजी)
बटव्यातील भुतांच्या गोष्टी (मराठी)
निष्कर्ष
संधिगत वात हा जीवनशैलीशी निगडित असलेला आजार असून, वेळीच उपचार केल्यास तो पूर्णतः बरा होऊ शकतो. आयुर्वेदाचे योग्य मार्गदर्शन, पंचकर्म आणि संतुलित आहार यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
आपल्या आयुर्वेदिक आरोग्यासाठी तत्काळ सल्ला घ्या!


